मराठी रीडअलॉंग गोष्टी. आता नव्याने स्टोरीविव्हरवर

Posted by Remya Padmadas on February 05, 2020

On the occasion of World Read Aloud Day, StoryWeaver is delighted to announce the launch of our delightful set of audio-visual storybooks, Readalongs, in Marathi. 

जागतिक रीड-अलाऊड  दिनाचं निमित्त साधून, रंगतदार मराठी ऑडिओ - व्हिजुअल गोष्टी स्टोरीविव्हरवर सादर करताना आम्हाला आनंद होतो आहे. 

मुलांना वाचनाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे कसा देता येईल यासाठी स्टोरीविव्हर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी नेहमीच जोडून घेते. २०१८ मध्ये आम्ही इंग्रजी आणि हिंदी भाषेत रीडअलॉंग गोष्टी सादर केल्या आणि त्याला शिक्षकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच प्रोत्साहित होऊन आता आम्ही या संग्रहात ६० मराठी गोष्टींची भर टाकत आहोत.

व्यावसायिक कलाकारांनी सहज शैलीत या गोष्टीचं रंगतदार वाचन केलं आहे. त्याला मजेदार संगीताची जोडही दिलेली आहे त्यामुळे रीडअलॉंग गोष्टी जिवंत होतात. मुलांसाठी ते आनंददायी शिक्षण व्हावं असा यामागचा उद्देश आहे. अशा प्रकारच्या  वाचनात, शब्दाचा उच्चार झाला की तो  लिखित शब्द उजळतो  आणि त्या उच्चाराचं बोट धरून मुलांना तो शब्द निवेदाकाबरोबर वाचणं, त्याचं 'सहवाचन' करणं सोपं जातं. आमच्या अगदी लहान गटातल्या वाचकांना डोळ्यासमोर ठेवून हा रीडअलॉंग संग्रह तयार केलेला आहे. गोष्ट ऐकताना, त्याच्या जोडीला लिखित मजकुरातला  शब्द आणि त्याचा उच्चार असं एकत्रितपणे समोर आल्यानं भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.

मराठी वाचनाचा आनंद लुटण्यासाठी हा संपूर्ण रीडअलॉंग संग्रह स्टोरीविव्हरवर जरूर बघा आणि ऐका.

लगेच वाचा


Do leave your thoughts in the comments section below. You can also reach out to us through our social media channels: Facebook, Twitter and Instagram.0 Comments