Launching StoryWeaver Marathi: An exciting new YouTube channel!


महाराष्ट्र्र दिनाचे निमित्त साधून, मराठीत गोष्टी वाचण्याचा आनंद  स्टोरीविव्हरला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. त्याचसाठी आहे हे नवीन  यू ट्यूब चॅनेल, 'स्टोरीविव्हर मराठी'!

Illustration by Hitesh Sonar, for Black Hats White Hats written by Siddharth Mehta, published by Pratham Books

'रीडअलॉंग' म्हणजे सहवाचन हा  उपक्रम मराठीत यशस्वीपणे  राबवल्यानंतर आता यू ट्यूबवर घेऊन येत आहोत व्हिडीओ, म्हणजे दृक-श्राव्य गोष्टी. 

व्यावसायिक कलाकारांनी सहज शैलीत या गोष्टीचं रंगतदार वाचन केलं आहे. त्याला मजेदार संगीताची जोडही दिलेली आहे त्यामुळे गोष्टी जिवंत होतात. शब्दाचा उच्चार झाला की तो  लिखित शब्द  उजळतो  आणि त्या उच्चाराचं बोट धरून मुलांना तो शब्द निवेदकाबरोबर वाचणं, सोपं जातं.  लिखित शब्द आणि त्याचा उच्चार असं एकत्रितपणे समोर आल्यानं मुलांना वाचनाची गोडी लागायला मदत होते.

अगदी लहान गटातल्या वाचकांना डोळ्यासमोर ठेवल्यानं, वाचन पातळी १ आणि २ अशाच गोष्टी यात आहेत. शिवाय व्हिडिओचा कालावधी ५ मिनिटांपेक्षा कमी ठेवल्यानं मुलांचं लक्ष चांगलं लागतं. पुन्हा पुन्हा येणारे विशिष्ट शब्द आणि आवाज, आकर्षक चित्रं, नाट्यमयता यांची मुलांना मजा वाटते. हे  लक्षात ठेवून मोठ्यानं  वाचायला मजा येईल अशा गोष्टीं निवडल्या आहेत. शिवाय 'स्टोरीविव्हर'वरील 'रीडअलॉंग'ची वैशिष्ट्ये जशीच्या तशी राखली आहेत.   

यू ट्यूब वर 'स्टोरीविव्हर मराठी' याठिकाणी  जाण्यासाठी  इथे क्लिक करा.

दर आठवड्याला नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.  

मजेत बघा!


Leave your thoughts in the comments section below! You can also reach out to us through our social media channels: FacebookTwitter and Instagram.

Be the first to comment.