#FreedomtoRead 2019 Unnati ISEC on their challenging journey of translating stories into Korku

Posted by Amna Singh on February 15, 2019

Unnati Institute for Social and Educational Change has been working in the district of Akola Akot and Telhara in the Vidarbha region of Maharashtra with children from the Korku tribal community since the last five years. They work towards the improvement of literacy skills of these children. Since the Korku language does not have a script, the organisation is developing resources using the Devanagari script to ensure that the children learn to read and write Korku. These resources include storybooks, songs, curriculum-related resources and reading material. It runs a programme on ‘Enhancing Language Skills of Children from Tribal Communities’ through education support classes with the objective of facilitating improvement in tribal children’s basic reading and writing with comprehension skills in Korku, their mother tongue and Marathi, which is a medium of instruction in schools. Tribal youth have taken the lead in translating Hindi and Marathi storybooks into Korku as part of this programme and children are excited and happy as they are getting to read stories in their own mother tongue. Sharad Prakash Suryawanshi, Program Manager Unnati ISEC shares the journey of building a Korku digital library.

                      

उन्नती संस्था गेल्या पाच वर्षापसून अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा या तालुक्यातील कोरकू आदिवासी मुलांना वाचन लेखन यावं, याकरिता काम करीत आहे. कोरकू मुलांना वाचन लेखन यावे, याकरिता संस्था कोरकू भाषेत उपलब्ध नसलेले साहित्य देवनागरी लिपी वापरून विकसित करण्याचे काम करीत आहे, कारण कोरकू भाषेला लिपी नाहीये. त्यात गोष्टींचे पुस्तके, गाणे, वाचनपाठ, शैक्षणिक साहित्य असे निर्मिती करीत आहे.

त्याचच एक भाग म्हणून विविध प्रकाशनाचे गोष्टींचे पुस्तके भाषांतर, रुपांतर करून मुलांना वाचनास उपलब्ध करून देत आहोत. त्यांना त्यांच्या भाषेत पुस्तके मिळाल्याने ते सुद्धा आनंदाने वाचन करतात. हे पाहून खूप समाधान वाटत आहे. हे भाषांतर करण्याचे काम कोरकू आदिवासी युवक-युवती हेच करतात. त्याची प्रक्रिया ही पुढील प्रमाणे सांगता येईल.

टप्पा पहिला - पुस्तकांची निवड : उपलब्ध पुस्तकांपैकी पुस्तकात ग्रामीण भागाचे चित्र, मजकूर, आशय पाहतो. तसेच स्त्री-पुरुष समानता दर्शवणारे, मुलांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी. अशा पुत्कांची निवड पूर्ण कार्यकर्ते करतात. 

टप्पा दुसरा - भाषांतर : निवडलेले पुस्तकाची प्रिंट काढली जाते, मग तीन कार्यकर्ते एकत्र बसतात, चर्चा करतात, आणि गोष्टीचे भाषांतर  सुरु होते. त्यांना काही शब्द समजत नाही, त्याचा अर्थ समजत नाही, त्यासाठी मग समन्वयकासोबत, शब्दकोश मध्ये पाहून चर्चा केली जाते. त्यानंतर जी गोष्ट भाषांतर केली, त्याची प्रिंट काढली जाते. आणि परत अजून भाषांतर बरोबर झाले का हे पहिले जाते, त्यावर चर्चा करून बदल केले जातात.  

टप्पा तिसरा - रुपांतर : जे पुस्तक भाषांतर केले, ते कार्यकर्ते घरी घेऊन जातात, आणि घरातील वरिष्ठांना, समुदायात लोकांना वाचून दाखवतात, त्यावर त्यांचे मत विचारात घेऊन, नोंद केली जाते. तसेच गावात ज्यांना लिहिता वाचता येतं, त्यांना मराठी आणि कोरकू भाषेतील पुस्तकांच्या प्रिंट वाचण्यास दिल्या जातात, त्यावरून त्यांच्या काही सूचना आल्या तर, त्या नोंदवून घेतल्या जातात. ही प्रक्रिया झाल्यावर, कार्यलयात दुसऱ्या दिवशी तिन्ही कार्यकर्ते परत बसतात, दोन्ही नोंदी पाहून चर्चा करतात, आणि तसे बदल करतो. 

टप्पा चौथा – पुस्तकात सर्व चर्चा करून संकलन केले जाते. त्याच्या मराठी, हिंदी आणि कोरकू भाषेतील पुस्तकाच्या रंगीत प्रिंट काढून किंवा दुकानातून पुस्तक विकत घेऊन, काही पुस्तके मिळत नाहीत, मिळाले तरी पाहिजे तेवढ्या प्रतींमध्ये मिळत नाही. हे पुस्तके मग शिकू आनंदे वर्गातील मुलांना, गावातील मुलांना उन्नती पुस्तक पेटी प्रकल्पांतर्गत वाचनासाठी, गोष्ट सांगण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.  

काम करीत असतांनाच्या येणाऱ्या अडचणी:

पुस्तक निवड करण्यात अडचण येते, कारण कोरकू भागातील घटक पुस्तकात असत नाहीत.

काही शब्दांचे अर्थ लवकर समजत नाही, सापडत नाही.

गावात लोकांना विचारून नोंद घेतांना बऱ्याच वेळेस दिवसा लोक उपलब्ध होतात, असे नाही. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत किंवा सकाळी एकदम लवकर त्यांच्या वेळा पाहून काम करावे लागते.

गावात शिकलेले लोक त्यात महिला यांचे प्रमाण फार थोड्या प्रमाणात आहे, त्यामुळे रुपांतर करायला मर्यादा येतात. 

तसेच कार्यकर्ते नियमित राहत नाही.

त्यांना भाषांतर, रुपांतर याचे प्रशिक्षण देऊन लगेचच समजत नाही, म्हणून काही दिवस त्यांची समज बनण्यात जातात.

कोरकू भाषा ही दर १० किलो. अंतरावर थोडी बदलते, त्यामुळे एकूण क्षेत्राचा विचार करून रुपांतर करावे लागते. 

कार्यालय हे गावात असल्याने बऱ्याच वेळेस लाईटची अडचण येते.

संगणक कमी असल्याने त्या ठिकाणी मर्यादा येतात.

कार्यकर्त्यांना तांत्रिक माहिती जास्त नसल्याने अडचणी येतात. 

स्तर एकचे एक पुस्तक रुपांतर करायला किमान एक पूर्ण दिवस लागतो. स्तर नुसार कालावधी वाढू शकतो. आणि मनुष्यबळ, तीन कार्यालयातील कार्यकर्ते, आणि गावातील किमान पाच लोक. 

भाषांतर, रुपांतर करणारे युवक युवती :

१. राजकन्या शांतीलाल गवते,  गाव: धोंडा आखर,  तहसील: तेल्हारा,  जि. अकोला, राज्य: महाराष्ट्र 

२.  माया श्रीराम मावस्कर,  गाव: भिली,  तहसील: तेल्हारा,  जि. अकोला,  राज्य:  महाराष्ट्र 

३.  ब्रिजलाल मोतीराम मावस्कर , गाव:  भिली,  तहसील: तेल्हारा, जि. अकोला,  राज्य: महाराष्ट्र 

४.  सुभाष चांदुजी केदार,  गाव: चंदनपुर, तहसील: तेल्हारा, जि. अकोला, राज्य: महाराष्ट्र   

Here's a little  glimpse of the stories Unnati ISEC has translated into Korku on StoryWeaver. Do take a look at all their stories here0 Comments