sk profile foto-002.jpeg

Sushrut Kulkarni, has 20 years experience  in the field of computer networks and websites. He is a technical writer and translates and writes in Marathi, Hindi, English and German. He writes for various reputed publishers, newspapers, documentaries and radio.

One of the major technical hurdles for regional languages was fonts. That sphere was dominated by proprietary and non-standard fonts.

मराठी आणि अन्य भारतीय भाषांना कॉंप्युटरवर रुळायला बराच काळ जावा लागला. याचं मुख्य कारण म्हणजे फॉंट वापरण्यातले तांत्रिक (आणि आर्थिकही!) अडथळे होते. सुरुवातीला केवळ वृत्तपत्रं आणि प्रकाशनसंस्थांकडेच कॉंप्युटरवर मुद्रण या मुख्य उद्देशानं मराठी वापरलं जात असे. वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेले फॉंट वेगवेगळ्या प्रमाणांवर आधारित असल्यानं एका कॉम्प्युटरवर टाईप केलेलं दुसऱ्याला त्याच्या कॉम्प्युटरवर वाचणं अनेकदा शक्यच होत नसे. दरवेळी फॉंट बसवणं किंवा ते विकत घेणं शक्य नव्हतं. यामुळं प्रादेशिक भाषांमधलं लेखन इंटरनेटवर उपलब्ध व्हायलाही खूप वेळ लागू लागला.

यावर उपाय सापडला तो युनिकोडच्या (Unicodeच्या) रुपानं! युनिकोड ही जगातल्या कुठल्याही कॉम्प्युटरवर (किंवा मोबाईल फोनवर) वाचता येईल अशी एक लिहिण्याची पद्धत आहे. कॉम्प्युटर क्षेत्रातील काही कंपन्यांनी आणि तज्ज्ञांनी एकत्र येऊन ३ जानेवारी १९९१ रोजी युनिकोड कॉन्सर्टियमची स्थापना अमेरिकेत केली. या सर्वांनी मिळून फॉन्टसाठी एक विशिष्ट मानक (स्टॅंडर्ड) बनवलं. यापुढं फॉन्टस्‍चा जो विकास आहे तो या युनिकोड आधारावर होईल असं ठरवण्यात आलं. त्यामुळं कुठल्याही फॉन्टमध्ये जगातल्या अनेक भाषा सामावता येऊ लागल्या. आता बहुसंख्य युनिकोड फॉंट नि:शुल्क उपलब्ध असल्याने इंटरनेटवर इंग्रजीखेरीज अन्य भाषांमध्ये देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर शक्य झालेली आहे.

 

Be the first to comment.